आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा तंबी दिली आहे. थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर गरळ ओकायची असेल, तर आधी राजीनामा द्या, अशा शब्दांत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना तंबी दिली आहे.
राज ठाकरेंनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पत्र पोस्ट केलं आहे, यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना वादग्रस्त वक्तव्य न करण्याबाबतचे आदेश दिले आहेत.
हे ही वाचा : “धक्कादायक! औक्षण करत असताना उडाला भडका, सांगलीत नवनिर्वाचित सरपंच थेट रूग्णालयात,”
राज ठाकरेंचं पत्र जसंच्या तसं :
माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना, सस्नेह जय महाराष्ट्र
सध्या माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाऊन वाट्टेल ते बोलायचं, प्रसिद्धी मिळवायची, असं करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्याच पक्षात दिसून येत आहे. माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाचे लाईक्स हाच्याने हे सगळे शेफारले आहेत. इतर पक्षांनी अशा लोकांचं काय करावं हे त्यांनी ठरवावं, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत हे खपवून घेतलं जाणार नाही.
माझ्या पक्षातल्या कोणालाही, पक्षांतर्गत बाबींवर काही म्हणणं मांडायचं असेल तर संबंधित नेत्यांशी बोला, माझ्याशी बोला. पण हे सोडून थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल, तर आधी राजीनामा द्या, मग काय घाण करायची आहे ती करा. पक्षात राहून असे प्रकार केलेत, तर हकालपट्टी अटळ आहे हे लक्षात ठेवा.
ही समज नाही, तर अंतिम ताकीद आहे ह्याची नोंद घ्या!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील प्रत्येकाने पक्षशिस्त पाळायलाच हवी ! pic.twitter.com/42cuKigAWk
— Raj Thackeray (@RajThackeray) December 21, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
चंद्रपूरमध्ये मनसेचा भगवा फडकला, दाताला ग्रामपंचायतीवर मनसेचं वर्चस्व
अमोल कोल्हेंनी घेतली रावसाहेब दानवे यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
निवडणुकांपूर्वीच अनेक ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा