Home देश विराट मोर्चा काढत आहेत त्यांना…; मुख्यमंत्री शिंदेंचं, ठाकरेंना प्रत्युत्तर

विराट मोर्चा काढत आहेत त्यांना…; मुख्यमंत्री शिंदेंचं, ठाकरेंना प्रत्युत्तर

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात बोलताना, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं. त्यानंतर भाजप नेत्यांकडून शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान सूरूच आहेत. यावरून आता महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे.

17 डिसेंबरला महाविकासआघाडी मुंबईत विराट मोर्चा काढणार आहे. जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा मोर्चा असणार आहे. फक्त राज्यपालच नाही तर महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांविरोधात हा मोर्चा असेल, असा इशारा उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला. यावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : “महाराष्ट्राच्या अपमानाविरोधात आता ठाकरे रस्त्यावर; ‘या’ तारखेला महाविकास आघाडीचा विराट मोर्चा”

‘आम्ही मुख्यमंत्री झाल्यावर आता काही लोक घराबाहेर येत आहेत. बेळगावच्या बाबतीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भूमिका जाहीर केली आहे. बेळगाव मध्येच काय देशाच्या कुठल्याही भागात कोणी कोणाला रोखू शकत नाही. आमचे मंत्री मराठा बांधवांच्या पाठीशी उभे राहतील. आम्हाला कोणी आक्रमकपणा आणि धाडस शिकवू नये. ते विराट मोर्चा काढत आहेत, त्यांना शुभेच्छा आहेत, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी यावेळी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल दिल्लीत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-20 बाबत बैठक बोलावली होती, या बैठकीला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. या बैठकीला उद्धव ठाकरे व शरद पवारांनाही आमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र या दोन्ही नेत्यांनी या बैठकीला दांडी मारली होती. यावरूनही एकनाथ शिंदेंनी टोला लगावला.

निमंत्रण सगळ्यांनाच गेलं होतं. देशप्रेम, विकासासारख्या अनेक गोष्टी यामध्ये आहेत. बैठकीला अनुपस्थित राहून त्यांना काय दाखवायचं होतं? हेच देशप्रेम आहे का? हेच राज्याचं प्रेम आहे का?, असा सवाल एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना यावेळी केला.

महत्त्वाच्या घडामोडी –

मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार?; थेट अजित पवारांकडून ऑफर

…तर त्यांची जीभ छाटली पाहिजे; शिवरायांवरील वक्तव्यावरून रूपाली पाटील आक्रमक

भाजप नेत्यांकडून शिवरायांचा अवमान सूरूच; आता रावसाहेब दानवेंकडून शिवरायांचा एकेरी उल्लेख, म्हणाले…