आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात बोलताना, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं. त्यानंतर आज भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही आज बोलताना, शिवाजी महाराजांबद्दल एक वादग्रस्त विधान केलं आहे.
संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला. त्यानंतर रायगडावर त्यांचं बालपण गेलं., असं वादग्रस्त विधान प्रसाद लाड यांनी केलं. यावरून राजकीय वातावरण जोरदार तापलं आहे. अशातच आता या प्रकरणावर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : भाजप नेत्यांकडून शिवरायांचा अवमान सूरूच; आता रावसाहेब दानवेंकडून शिवरायांचा एकेरी उल्लेख, म्हणाले…
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची जीभ छाटली पाहिजे, असं वक्तव्य रूपाली पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केलं.
प्रसाद लाड यांना शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती नसेल तर तो त्यांनी माहिती करावा. सतत बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांची जीभ छाटली जावी, अशी संतप्त प्रतिक्रिया रूपाली पाटील यांनी यावेळी दिली.
महत्त्वाच्या घडामोडी –
“ठरलं तर! भीमशक्ती-शिवशक्ती युतीवर उद्या शिक्कामोर्तब?; ठाकरे-आंबेडकर उद्या करणार घोषणा?”
राज्यपालांनंतर आता भाजप आमदार प्रसाद लाड यांचं शिवाजी महारांबद्दल वादग्रस्त विधान, म्हणाले…
“मनसेनं विजयी खातं उघडलं; जत ग्रामपंचायतीत मनसेच्या प्रियांका खिलारे यांची बिनविरोध निवड”