अंधारे बाई, याद राखा, यापुढे राजसाहेबांच्या नातवाला काय बोललात तर…; मनसैनिकांचा इशारा

0
176

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली. यात त्यांनी राज ठाकरे यांचा नातू किआन याचाही उल्लेख केला. यावरून आता मनसैनिक आक्रमक झाले असून मनसैनिकांनी, सुषमा अंधारेंना सूचक इशारा दिला आहे.

अंधारे बाई, या पुढे याद राखा. संबंध नसताना जर राजसाहेबांच्या नातवाला आपण राजकारणासाठी बोललात. तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तुमच्या कानाजवळ डी.जे. वाजवल्याशिवाय राहणार नाही, असं ट्विट करत मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांना इशारा दिला आहे.

ही बातमी पण वाचा : “जयंत पाटील करेक्ट कार्यक्रम करण्यात तरबेज, याेग्य वेळी ते करेक्ट कार्यक्रम करतील”

चुकलं ते कबूल करण्यापेक्षा चोराच्या उलट्या बोंबा … साहेबांच्या नातावावर बोलून चीप पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न कोणी केला?… आणि हो नांदेड प्रकरणात काय भूमिका राजसाहेबांनी घेतली ते पहा डोळस असाल तर .. बाकी शहाण्यास फार सांगणे न लागे .., असं शालिनी ठाकरे म्हणाल्या.

महत्त्वाच्या घडामोडी – 

अजितदादा मुख्यमंत्री झाले तर…; सुप्रिया सुळेंची मोठी प्रतिक्रिया

भाजपला आमदार फोडायला वेळ आहे, मात्र…; ‘त्या’ घटनांवरून विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल

Breaking News! महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here