आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात दाखल झाली आहे. खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा सुरु आहे. मात्र अवघ्या देशाचं लक्ष 18 तारखेच्या शेगावच्या काँग्रेसकडे सभेकडे लागलं आहे.
राहुल गांधी यांची 18 नोव्हेंबर रोजी शेगाव येथे भारत जोडो यात्रा येणार आहे. या दिवशी काँग्रेसतर्फे मोठं शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. तसेच महत्वाचं म्हणजे महाविकास आघाडीतील नेत्यांनाही यासाठी निमंत्रित केलं आहे. त्यामुळे गांधी, ठाकरे, पवार हे एकत्र दिसणार का?, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
हे ही वाचा : जितेंद्र आव्हाडांच्या विनयभंग प्रकरणावर आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी याविषयी माहिती दिली आहे. शेगाव येथील सभेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे येणार का.. याबाबतीत शिक्कामोर्तब झाला नसल्याचं यशोमती ठाकूर यांनी यावेळी स्पष्ट केलं.
19 नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन असल्याने त्यांच्या समाधीवर सोनिया गांधी उपस्थित राहणार आहेेत. तसेच बुलढाणा मध्ये रात्रीच्या विमान उड्डाणासाठी व्यवस्था नसल्याने, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे शेगावच्या सभेला उपस्थित राहण्यासंदर्भात निश्चित झाले नसल्याचे यशोमती ठाकूर यांनी यावेळी सांगितलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
आगामी विधानसभा निवडणूकीआधी राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘या’ आमदाराने पक्षाला ठोकला रामराम
ब्राम्हण असल्याचा गर्व, परंतु आम्हांला मार्केटिंग करता येत नाही- अमृता फडणवीस
जितेंद्र आव्हाडांच्या विनयभंगाच्या प्रकरणावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…