आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 व अपक्ष 10 आमदारांसोबत बंड केलं. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि शिंदेंनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यानंतर शिवसेनेेतील अनेक नेत्यांनी शिंद गटात प्रवेश केला.
अशातच 2-3 दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. आता अशातच ठाकरे गटाचे आणखी एक नेते शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची बातमी समोर येत आहे.
हे ही वाचा : जामीन मिळताच जितेंद्र आव्हाडांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, राज ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी…
ठाकरे गटाचे कोकणातील एकमेव आमदार राजन साळवीही शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं समोर येत आहे. राजन साळवी यांनी आज रत्नागिरी येथे शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
ठाकरेंचा शिंदेशाहीला पुन्हा दणका; शिंदे गटात प्रवेश केलेल्या ‘या’ नेत्याची पुन्हा ठाकरेंकडे गृहवापसी
‘या’ निवडणूकीत महाविकास आघाडीचा सूपडा साफ; भाजप-शिंदे गटाचा दणदणीत विजय”
“ठाकरेंचा शिंदेंना दणका; शिंदे गटात प्रवेश केलेल्या नगरसेविकेनं पुन्हा ठाकरे गटात केली घरवापसी”