Home महाराष्ट्र राज्य सरकार आपलं अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकारवर खापर फोडत आहे- देवेंद्र फडणवीस

राज्य सरकार आपलं अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकारवर खापर फोडत आहे- देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे मंत्रालयाकडून मागणीपेक्षा कमी रेल्वे मिळत असल्याचं सांगितलं होतं. यावरुन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य़ सरकारवर निशाणा साधला.

महाराष्ट्र सरकार आपलं अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकारवर खापर फोडत असून हे चुकीचं आहे. रेल्वे मंत्री आणि मंत्रालयाने महाराष्ट्राला वारंवार मदत केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने राजकारण करणं बंद केलं पाहिजे,  असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

रेल्वे मंत्रालयाकडून महाराष्ट्र सरकारला 525 ट्रेन देण्यात आल्या आहेत, ज्यामधून 7 लाख 30 हजार श्रमिकांनी प्रवास केला आहे. जितक्या ट्रेन मागितल्या जात आहेत, त्यामध्ये स्वत: रेल्वे मंत्री लक्ष घालत असून ट्रेन पुरवत आहेत. अनेकदा रात्री उशिरा यादी पाठवल्यानंतरही ट्रेन दिल्या जात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या खासदारांनी केलेलं वक्तव्य पूर्ण राजकारण आहे,” अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

राजकारण करु नका हे नेमकं सांगताय कुणाला?; आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्याना खोचक टोला

केंद्र सरकारने लाखो कोटींची पॅकेज वाटली, पण हाती काय आलं?; उद्धव ठाकरेंचा सवाल

मुख्यमंत्र्यांचं कोरोनायोद्ध्यांना भावूक पत्र; म्हणाले…

ट्रेंडिंग घडामोडी –