आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
गांधीनगर : गुजरातच्या राजकोटमधील मोरबी भागात पुल कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये 400 लोकं नदीत पडले आहेत, अशी माहिती समोर येत आहे.
मोरबीतील मच्छू नदीवर असणारा केबल ब्रिज अचानक कोसळला आहे. त्यामुळे मोठी हानी झाली आहे. अपघाताच्या वेळी पुलावर मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. या दुर्घटनेत जवळपास 400 लोकांचा जीव धोक्यात असल्याची माहिती समोर येत आहे.
हे ही वाचा : संकटमोचक मिलिंद नार्वेकर, ठाकरेंची साथ सोडणार?; शिंदे गटातील मंत्र्याच्या विधानाने खळबळ
देशभरात सध्या छटपुजेचा उत्साह आहे. छटपुजेनिमित्त मोठ्या संख्येने लोक या ब्रिजवर उपस्थित होते. पूल कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस, बचाव पथक, अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
संकटमोचक मिलिंद नार्वेकर, ठाकरेंची साथ सोडणार?; शिंदे गटातील मंत्र्याच्या विधानाने खळबळ
…तर मी ‘त्या’ शिवसैनिकांना घरात घुसून मारेन; मनसेच्या ‘या’ नेत्याचा इशारा
बच्चू कडूंसह धनुष्यबाणावर निवडून आलेले 8 आमदार आमच्या संपर्कात; ‘या’ नेत्याचा गाैफ्यस्फोट