मुंबई : भाजपने ठाकरे सरकारविरोधात शुक्रवारी राज्यभर आंदोलन केलं. तर त्यांच्या या आंदोलनावर सत्ताधारी शिवसेनासहित राष्ट्रवादी आणि काँग्रेसने कोरोनाच्या कठीण काळात राजकारण करत असल्याची टीका करत भाजपला महाराष्ट्र द्रोही म्हटलं. यावरुन भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी आज महाविका आघाडीवर टीका केली आहे.
महाराष्ट्र सरकारला विरोध केला तर आम्ही महाराष्ट्र द्रोही मग जे केंद्र सरकारला विरोध करतात त्यांना देशद्रोही म्हणायचं का?, असा सवाल अवधूत वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे.
दरम्यान, यासंदर्भात अवधूत वाघ यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्र सरकारला विरोध केला तर आम्ही महाराष्ट्र द्रोही?
मग जे केंद्र सरकारला विरोध करतात त्यांना देशद्रोही म्हणायचं का?— Avadhut Wagh (@Avadhutwaghbjp) May 23, 2020
महत्वाच्या घडामोडी –
मी लुक्क्याना धमकी देत नाही; निलेश राणेंचा रोहित पवारांवर पलटवार
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी जाहीर केली राजकीय निवृत्ती
निलेश राणेंच्या धमकीला मी घाबरत नाही; रोहित पवारांच उत्तर
ट्रेंडिंग घडामोडी –
मुख्यमंत्र्यांचं कोरोनायोद्ध्यांना भावूक पत्र; म्हणाले…https://t.co/CrwzB3Kc5e@CMOMaharashtra @OfficeofUT #CoronaWarriors #coronavirus
— घडामोडी (@ghadamodi1) May 23, 2020