आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेसोबत बंड करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापन केली असली तर दोन्ही गटाकडून एकमेकांचे नेते फोडण्याचं काम सूरू आहे. अशातच एकमेकांचे नेते फोडू नका, असे आदेश भाजपच्या दिग्गज नेत्यांनी दिले होते. या शिंदे गटाने हा आदेश धुडकावून लावला आहे.
मुंबईतील भाजपचा महामंत्रीच शिंदे गटाने फोडला आहे. भाजपचे उत्तर भारतीय सेलचे महामंत्री राम यादव आणि त्यांच्या पत्नी रेखा यादव यांनी शिंदे गटात म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेनामध्ये प्रवेश केला आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत यादव यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
हे ही वाचा : “अंधेरीची निवडणूक ‘राज ठाकरेंनी’ एकहाती जिंकली”
दरम्यान, यादव यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे, आगामी मुंबई महानगरपालिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
शिंदेंसोबत गेलेले अनेक आमदार उद्धव ठाकरेंकडे पुन्हा येणार?; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने खळबळ
आमदार संजय शिरसाट यांच्या प्रकृतीबाबत, डाॅक्टरांनी दिली ‘ही’ मोठी अपडेट, म्हणाले…
“राष्ट्रवादीची यशस्वी खेळी; भाजपच्या ‘या’ नेत्यांनी हाती बांधलं घड्याळ”