Home महाराष्ट्र आम्ही जाहीर केलेलं पॅकेज पाहून भाजप नेत्यांचे डोळे पांढरे होतील- हसन मुश्रीफ

आम्ही जाहीर केलेलं पॅकेज पाहून भाजप नेत्यांचे डोळे पांढरे होतील- हसन मुश्रीफ

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं सरकार लवकरच मोठं पॅकेज जाहीर करेल. हे पॅकेज पाहून भाजप नेत्यांचे डोळे पांढरे होतील, असं म्हणत राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

महाविकास आघाडी सरकार कसं अडचणीत येईल, यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. जीएसटीचे 12 हजार कोटीची थकबाकी द्यायची होती. आज मी आकडा घेतला साडेपाच हजार कोटीची थकबाकी यायची आहे, असं मुश्रीफ म्हणाले.

दरम्यान, केंद्राने 20 लाख कोटी जाहीर केलं मात्र हे कसलं पॅकेज आहे? सगळं कर्जच आहे. पेंडिंग आणि लेंडिंग यामध्ये खूप मोठा फरक आहे. याचा लोकांना काहीही फायदा नाही. आमचं महाराष्ट्र सरकार बारा बलुतेदार आणि श्रमिकांना असं मोठं पॅकेज देईल की भाजपचे डोळे पांढरे होतील, असंही हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे .

ट्रेंडिंग घडामोडी – 

लॉकडाउन सुरू झाल्यापासून राज्यात सायबर गुन्हे वाढले- अनिल देशमुख

गरजू नागरिकांसाठी छगन भुजबळांनी केंद्राकडे केली ‘ही’ महत्त्वाची मागणी

सचिन की विराट? या प्रश्नावर गौतम गंभीर म्हणाला…

महत्वाच्या घडामोडी –