आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेसोबत बंडखोरी कर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवणी करून सरकार स्थापन केलं. यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. मात्र हे बंड नेमकं कशामुळं झालं, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. यावर आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘एकनाथ शिंदेंच्या हालचालींची चाहूल आम्हाला दीड वर्षांपूर्वीच लागली होती, असा खुलासा आदित्य ठाकरेेंनी यावेळी केला. मुंबई तक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
हे ही वाचा : शिवसेना-काँग्रेस तपास यंत्रणांना कमजोर करण्याचं काम करत आहेत; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
आमच्या घरातही याबाबत चर्चा व्हायची. याची कुजबूजही आम्हाला लागली होती, त्यांच्या जवळच्या लोकांवर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकण्यात येत होता. मी, सुभाष देसाई आणि नितीन राऊत दावोसमध्ये होतो. आम्ही महाराष्ट्रात 80 हजार कोटींची गुंतवणूक आणत होतो. तेव्हाच 20 मे रोजी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना बोलवून घेतलं,, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. ‘तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय का? नेमकी काय गडबड सुरू आहे, असं उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना विचारलं,’ असा गाैफ्यस्फोटही आदित्य ठाकरेंनी यावेळी केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; शिंदे गटाला मिळाली ‘ढाल-तलवार’
“जनता बाळासाहेबांची छबी राज ठाकरेंमध्ये बघत आहे”
…म्हणून ठाकरेंनी भाजपसोबतची युती तोडली; मंत्री दीपक केसरकरांचा मोठा गाैफ्यस्फोट