मुंबई : शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आले आहे. त्यानंतर शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगाला तीन चिन्हे सोपवण्यात आली होती. यामध्ये काल ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले होते. तर आता शिंदे गटालाही नवे चिन्ह मिळाले आहे.
हे ही वाचा : “जनता बाळासाहेबांची छबी राज ठाकरेंमध्ये बघत आहे”
निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव काल मिळालं असून आज शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह देण्यात आले आहे.
निवडणूक चिन्हासाठी शिंदे गटाने निवडणूक आयोगाला दोन मेल पाठवले होते. पहिल्या मेलमधून शंख, तुतारी आणि रिक्षा ही तीन चिन्हे शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर ठेवली होती. तर, दुसऱ्या मेलमध्ये ढाल-तलवार, सूर्य, पिंपळाचे झाड ही तीन चिन्हे आयोगासमोर ठेवण्यात आली होती. त्यापैकी ढाल-तलवार हे चिन्ह शिंदे गटाला मिळाले आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
…म्हणून ठाकरेंनी भाजपसोबतची युती तोडली; मंत्री दीपक केसरकरांचा मोठा गाैफ्यस्फोट
‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव मिळाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…