आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नाव गोठवलं. यावर बोलताना शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला होता.
महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल होतेय. 40 लोकांमुळं चिन्ह गोठवलं म्हणतात , असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावरून आता शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
याच 40 लोकांमुळे तुम्ही अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदी राहिला, हे उद्धव ठाकरे कसं काय विसरतात, आमची बदनामी थांबली पाहिजे, वर्षाच्या बाहेर उभे राहून 10 वेळा फोन करायचो, आत येऊ का म्हणून, तरी ते भेटायचे नाही, असं केसरकर म्हणाले.
हे ही वाचा : ठाकरे गटाला नाव मिळताच सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या.. ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ नाम ही काफी हैं
हिंदुत्वाचा विचार बाळासाहेबांचा होता. पण उद्धव ठाकरे त्यापासून दूर जायला लागले. भाजपला नावं ठेवली गेली. मग त्यांच्यासोबत सरकार बनवायला का तयार झाले होते. फक्त मुख्यमंत्री पद देतील की नाही याची शाश्वती नसल्यामुळे त्यांच्याशी सरकार केलं नाही., असा गाैफ्यस्फोट केसरकरांनी यावेळी केला.
आम्ही त्यांना काँग्रेससोबत राहू नका असं सांगितलं होतं. हिंदुत्त्वच्या विचारासोबत आहेत का? अजूनही त्यांच्याच सोबत आहेत, हे त्यांनी स्पष्ट करावं. 40 लोकांच्या मतदारसंघात अडीच वर्षात अजिबात काम झाली नाहीत, असंही केसरकर म्हणाले.
युतीची किंमत बाळासाहेब ठाकरे अटलबिहारी यांनी माहीत होती, ते नसताना युती का तोडली? एका तरी प्रश्नाचं खरं उत्तर द्या. भाजप सोबत जाणार होते की नाही तर सांगा. महाराष्ट्र ठाकरे फॅमिलीच्या बापाचा आहे का, असं विचारणारी व्यक्ती चालते का स्टेजवर? हिंदुत्वासोबत राहा इतकंच सांगितलं, असंही केसरकरांनी यावेळी म्हटलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव मिळाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
“मोठी बातमी! ‘या’ निवडणूकीसाठी आशिष शेलार-शरद पवारांची युती”
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार?; राज यांच्या ‘त्या’ विधानानं चर्चांना उधाण