“नाशिक महापालिकेच्या इमारतीला आग”

0
247

नाशिक : नाशिक महापालिकेमधील शिवसेना गटनेत्याच्या कार्यालयाला आग लागल्याची घटना घडली आहे. महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांच्या कार्यालयाला ही आग लागली आहे.

महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयाला ही आग लागली आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचलेले आहेत. धुराचे लोट पसरले आहेत. अग्निशमन दलाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. अग्निशमन दलाच्या 2 गाड्या याठिकाणी पोहोचलेल्या आहेत.

दरम्यान, आग नेमकी कशी लागली याबाबतची माहिती मिळाली नाही. मात्र कार्यालयात सॅनिटायझिंगचं काम सुरु होतं. यावेळी शॉर्ट सर्किंटमुळे आगीचा भडका उडालेला असेल, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“सरकार पाडण्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत प्रयत्न, पण…”

आपल्या विचारांचा नेता मुख्यमंत्री व्हावा असं सगळ्यांनाच वाटतं, त्यात गैर काय?- सुप्रिया सुळे

मला मुख्यमंत्री व्हावंसं वाटलं तर काय करु?- शरद पवार

धनंजय मुंडेंवर खोटे आरोप करणाऱ्या रेणू शर्मावर कारवाई व्हावी- चित्रा वाघ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here