आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवाजी पार्कवरील ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली.
एका अर्थी झालं ते बरं झालं. बांडगुळं सगळी छाटली गेली. ही बांडगुळं आपण आपल्या फांद्यांवर पोसत होतो. पण त्यांच्या लक्षात आलं नाही की, बांडगुळांची मुळं फांद्यांमध्ये असतात, पण फांद्यांची मुळं जमीनीत असतात. बांडगुळाला स्वत:ची ओळख नसते. तो सांगू शकत नाही की तो बांडगूळ आहे. अंगावर आता आलेलाच आहात, आता आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांना शिंगावर घ्यावं लागेल. प्रत्येक निवडणुकीत त्यांना पाणी पाजावं लागेल, असं ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा : “शिवसेना विचार आहे, शिवसेना संपणार नाही”
मी लढणाऱ्या पित्याचा लढणारा मुलगा आहे. पहिल्या दिवसापासून मी शिवसेनेवर आलेली संकटं बघत मोठा झालो आहे. आजही माझ्या हातात काहीच नाहीये. माझ्यासोबत चालायचं असेल, तर निखाऱ्यावर चालण्याची तयारी हवी. जसं मी माझ्या पित्याला वचन दिलं होतं की मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन, तसंच मी तुम्हाला वचन देतोय.. तुमच्या मनातल्या या आगीतून उद्या हिंदुत्वाचा वणवा पेटणार आहे. त्यात सगळ्या गद्दारांची गद्दारी भस्मसात होणार आहे. तुम्ही साथ द्या, मी पुन्हा तुम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन, असा निर्धार ठाकरेंनी यावेळी केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर, म्हणाले, आम्ही गद्दारी नाही केली, तर…
“तुमच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का या जन्मीतरी पुसला जाणार नाही”