आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेना कुणाची?, शिंदेंची की ठाकरेंची?, या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे समोरासमोर आहेत. अशातच शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत महत्त्वाची बातमी समोर आलीय.
धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय येत्या 48 तासांत लागण्याची शक्यता आहे.7 ऑक्टोबर आधीच केंद्रीय निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्हाबाबत आपला निर्णय देईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे येत्या 48 तासांत धनुष्यबाण चिन्ह हे कुणाला मिळतं, हे स्पष्ट होईल, असं बोललं जात आहे.
हे ही वाचा : अजितदादा हे शिंदे-भाजपच्या युती सरकारमध्ये आले तर त्यांचे स्वागतच; रामदास आठवलेंकडून ऑफर
धनुष्यबाण चिन्हाबाबत आपली भूमिका मांडण्यासाठी शिवसेनेला निवडणूक आयोगाने दिलेली मुदतही आज संपतेय. शिवसेना पक्षासोबत शिंदे गटाने धनुष्यबाण चिन्हावरही दावा केला होता. त्यामुळे हा वाद अखेर आता निवडणूक आयोगाच्या दारात उभा ठाकलाय. केंद्रीय निवडणूक आयोग याबाबत नेमका काय निर्णय घेतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
राष्ट्रवादीचा ‘हा’ मोठा नेता करणार भाजपामध्ये प्रवेश?; रावसाहेब दानवेंसोबत बंदद्वार चर्चा