आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यामध्ये सरकार स्थापन केलं, यानंतर राज्यात शिंदे गटाविरूद्ध ठाकरे गट झाला आहे. यानंतर दरवर्षीप्रमाणे यंदाचा दसरा मेळावा कोणाचा होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाष्य केलं होतं.
उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला तुम्ही जाणार का? असा प्रश्न राणे यांना पत्रकारांनी विचारला असता, यावर राणेंनी उत्तर दिलं. उद्धव ठाकरेंनी जर मला आमंत्रण दिलं तर मी दसरा मेळाव्याला जाईल, असं राणे म्हणाले. मात्र उद्धव ठाकरे मला आमंत्रण देणार नाहीत, हे माहिती आहे, असंही राणेंनी म्हटलं होतं. यावर आता शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : आदित्य ठाकरेंनी तोंड सांभाळून बोलावं, आम्ही तोंड उघडलं तर…; शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटलांचा इशारा
“बघू उद्या संध्याकाळपर्यंत काय होतंय ते, असं उत्तर नीलम गोऱ्हे यांनी यावेळी दिलं. “ठाकरे त्यांना देतील का आमंत्रण?” असा प्रश्न पत्रकारांनी गोऱ्हे विचारला. त्यावर उत्तर देताना गोऱ्हेंनी हसतच उत्तर दिलं, “त्यांना उत्तर चांगलं माहित आहे की, त्यांची कायमची हकालपट्टी केलेली आहे. तरी ते बोलत आहेत तर त्यांच्या मनामध्ये कुठेतरी दुगदुगी शिल्लक आहे असं दिसतंय, असं गोऱ्हे म्हणाल्या.
महत्त्वाच्या घडामोडी –
राष्ट्रवादीचा ‘हा’ मोठा नेता करणार भाजपामध्ये प्रवेश?; रावसाहेब दानवेंसोबत बंदद्वार चर्चा
“महाजन म्हणाले, एकनाथ खडसे भाजपमध्ये परतणार; खडसेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले, होय, मी…”