आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
अकोले : राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या पिता-पूत्रांना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर, नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही पिचड समर्थकांना पराभवाचा धक्का बसला, या धक्यातूनच सावरत नाहीत, तोवर आता अगस्ती साखर कारखान्याच्या निवडणुकीतही पिचड गटाला पराभवाचा धक्का बसला.
हे ही वाचा : मराठा आरक्षणाबाबत विरोधकांवर बोलताना शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत यांची जीभ घसरली, म्हणाले…
अगस्ती साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अशोक भांगरे यांनी पिचड यांना पराभवाचा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीच्या सर्वच्या सर्व 21 जागांवर विजय झाल्यामुळे हा पिचड यांना मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, या पराभवामुळे पिचड यांनी आमदारकी, ग्रामपंचायतनंतर आता साखर कारखान्याचीही सत्ता गमावली आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“पाकिस्तान जिंदाबादच्या विरोधात पुण्यात मनसेचं खळखट्याक आंदोलन, पाकिस्तानचा झेंडा जाळला”
उद्धव ठाकरेंचा भाजपाला धक्का; भाजपच्या ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना ठेचून मारा- आशिष शेलार