मुंबई पोलीस तुम्ही आमची शान आहात; सुशांत प्रकरणावरुन केदार शिंदेंची प्रतिक्रिया

0
296

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या तपासावरून मुंबई पोलिस व बिहार पोलिस आमने-सामने आले आहेत. तसेच मुंबई पोलिस बिहार पोलिसांना सहकार्य करत नसल्याचा एक आरोप सतत होत आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

आता बास्स झालं. मुंबई पोलीस तुम्ही आमची शान आहात. सतत तुमच्या विषयी नकारात्मक बातम्या सुरु आहेत. कुणीही येतंय आणि टिकली वाजवून जातंय. तोंडावर त्यांना पुरावे देऊन या. सुशांत आत्महत्या प्रकरणाचा समारोप करा, तुमच्यावर आम्हाला गर्व आहे, असं केदार शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,  केदार शिंदे यांनी ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

शरद पवार आणि उद्धव ठाकरे अर्जुनासारखे गोंधळलेले- संभाजी भिडे

मनसेच्या अविनाश जाधवांचा जामीन अर्ज फेटाळला

…तर मुंबई पोलिसांची सिक्युरिटी कव्हर सोडून द्या; शिवसेनेचं अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर

राजेश टोपेंच्या कर्तव्यनिष्ठेपुढे मला आधी लगीन कोंढाण्याचं म्हणणाऱ्या तानाजीची आठवण येते- रोहित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here