आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 6 जिल्ह्यांचे पालकमंत्री असतील.
फडणवीस नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.
हे ही वाचा : गृहमंत्रीपदासाठी अजित दादा योग्य, राष्ट्रवादीत लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा दावा
दरम्यान, राज्य सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर शिंदे गटाला पालकमंत्रीपदांच्या यादीत तरी जास्त जिल्हे मिळतील, अशी शिंदे गटाच्या आमदारांना आशा होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनाच तब्बल 6 जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आल्याचं समोर आलं आहे.
इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे :
चंद्रकांत पाटील- पुणे
विजयकुमार गावित – नंदुरबार,
गिरीश महाजन – धुळे,लातूर, नांदेड,
गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव
दादा भुसे- नाशिक,
संजय राठोड – यवतमाळ, वाशिम,
सुरेश खाडे – सांगली,
संदिपान भुमरे – औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
उदय सामंत – रत्नागिरी, रायगड
तानाजी सावंत -परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)
रवींद्र चव्हाण – पालघर, सिंधुदुर्ग,
अब्दुल सत्तार- हिंगोली,
दीपक केसरकर – मुंबई शहर, कोल्हापूर,
अतुल सावे – जालना, बीड
शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,
मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर
महत्त्वाच्या घडामोडी –
वारसा मैदानाचा नसतो विचाराचा असतो: मनसेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
मोठी बातमी! एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार?; खुद्द एकनाथ खडसेंनी केला खुलासा, म्हणाले…
उद्धव ठाकरेंची यशस्वी खेळी; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”