कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी स्वतःचं घर होम क्वारंटाईनसाठी दिलं आहे. कोल्हापुरातल्या रुकडी येथे असणारे आपलं घर त्यांनी होम क्वारंटाईनसाठी दिलं आहे.
होम क्वारंटाइनसाठी स्वतःचं घर देणारे धैर्यशील माने हे एकमेव खासदार म्हणावे लागतील. त्यामुळे अलगीकरणाच्या नव्या कोल्हापुरी पॅटर्नची सुरुवातच त्यांनी केली आहे.
दरम्यान, एखादा व्यक्ती परजिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात येत असेल तर त्याला संबंधित ठिकाणी संस्थात्मक अलगीकरण करण्यात येत आहे. मात्र त्यांचा निगेटीव्ह अहवाल आल्यानंतर त्यांना आता त्यांच्या घरी जायची सोय केली जाणार आहे, असं धैर्यशील माने म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
निलेश राणेंनी रोहित पवारांची काढली लायकी; म्हणाले…
घराच्या अंगणाला ‘रणांगण’ बनवणं याला शहाणपण म्हणत नाहीत; अजित पवार संतापले
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं- चंद्रकांत पाटील
साहेबांच्या पत्राची चिंता न करता राज्यासाठी आपण काय करतो, याचं आत्मपरीक्षण करा- रोहित पवार