मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजपनेते निलेश राणे यांच्यात ट्विटरवर वॉर सुरू झालं आहे शरद पवार यांनी शुक्रवारी नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलं होतं. त्यावरून निलेश राणेंनी टीका केली होती. त्याला रोहित पवारांनी उत्तर दिलं होतं. आता तर निलेश राणेंनी रोहित पवारांची लायकीच काढली आहे.
गल्लीतलं शेंबडं पोर लहान लहान गोष्टीसाठी कसं किर किर करत अस्त तसं एक शेंबडं माझ्या आजोबांच्या पत्रावर कोणी बोलू नका म्हणून किर किर करतंय. ह्या वांग्याची लायकी काय आमच्या नेत्यांवर बोलायची? कोपर्डीची घटना, मराठा क्रांती मोर्चे झाले पण हा लुक्का तेव्हा काही बोलाल नाही, असं म्हणत निलेश राणेंनी रोहित पवारांवर टीका केली.
दरम्यान,साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी, असं रोहित पवार म्हणाले होते.
गल्लीतलं शेंबडं पोर लहान लहान गोष्टीसाठी कसं किर किर करत अस्त तसं एक शेंबडं माझ्या आजोबांच्या पत्रावर कोणी बोलू नका म्हणून किर किर करतंय… ह्या वांग्याची लायकी काय आमच्या नेत्यांवर बोलायची? कोपर्डीची घटना, मराठा क्रांती मोर्चे झाले पण हा लुक्का तेव्हा काही बोलाल नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 20, 2020
महत्वाच्या घडामोडी-
घराच्या अंगणाला ‘रणांगण’ बनवणं याला शहाणपण म्हणत नाहीत; अजित पवार संतापले
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं- चंद्रकांत पाटील
साहेबांच्या पत्राची चिंता न करता राज्यासाठी आपण काय करतो, याचं आत्मपरीक्षण करा- रोहित पवार