Home महाराष्ट्र कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं- चंद्रकांत पाटील

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं- चंद्रकांत पाटील

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रदुर्भाव वाढत चालला आहे त्यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघडीवर निशाणा साधला आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. त्यामुळे या सरकारला जागे करून प्रभावी काम करण्यास भाग पाडण्यासाठी भाजपाने महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू केले आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

पहिला कोरोना पेशेंट महाराष्ट्रात 9 मार्चला सापडला त्याच दिवशी केरळमध्ये ही पेशंट सापडला. केरळची संख्या 70 दिवसांमध्ये एक हजार पार झाला नाही. पण महाराष्ट्रात 70 दिवसात 40 हजारचा आकडा पार झाला. यावरुन महाराष्ट्र सरकार पुर्णपणे अपयशी ठरल्याचं उदाहरण आहे, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

साहेबांच्या पत्राची चिंता न करता राज्यासाठी आपण काय करतो, याचं आत्मपरीक्षण करा- रोहित पवार

राज्यपालांकडे तक्रारी करण्यापेक्षा, जबाबदार विरोधी पक्ष नेता म्हणून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणं योग्य- रोहित पवार

करोनाग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या जेवणात घोटाळा- किरीट सोमय्या

…अन्यथा आपल्या विधानाला कोणताही अर्थ उरणार नाही; अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र