आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चढाओढ सूरू आहे. तसेच शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात चढाओढ सुरु असतानाच यात आता युवासेना विस्तारकानं प्रतिक्रिया दिली आहे.
दसरा मेळाव्यावरुन, शिवाजी पार्क मैदान कुदळ फावड्याने उखडून टाकू, अशी धमकीच युवासेना विस्तारकानं शिंदे गटाला दिली आहे.
हे ही वाचा : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना धक्का : ‘या’ माजी आमदार-सभापतींसह 35 सरपंच शिंदे गटात सामील
सत्तेचा दुरुपयोग करुन शिंदे गटाने शिवतीर्थावर मेळावा घेण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण शिवतीर्थ मैदान कुदळ फावड्याने उखडून काढू, असा धमकीवजा इशारा युवासेना राज्य विस्तारक शरद कोळी यांनी शिंदे गटाला दिला.
दरम्यान, शिवसेना ही फक्त उध्दव ठाकरेंच्या बापाची म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची आहे. त्यामुळे उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेशिवाय दुसरा कोणाचाही मेळावा येथे होणार नाही, असंही कोळी म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
शिवसेनेचा काँग्रसला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
उद्धव ठाकरेंसाठी शिवसैनिकांची बीड ते मुंबई पायी ‘निष्ठा’ यात्रा
वेदांता-फाॅक्सकाॅननंतर आता ‘हा’ मोठा प्रकल्पही राज्याबाहेर?; आदित्य ठाकरेंचा मोठा खुलासा, म्हणाले…