Home महाराष्ट्र करोनाग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या जेवणात घोटाळा- किरीट सोमय्या

करोनाग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या जेवणात घोटाळा- किरीट सोमय्या

मुंबई :  मुंबईत कोरोनाग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या खाण्यात मोठा घोटाळा असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरवर यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे.

मुंबईत हायरिस्क करोनाबाधित व्यक्तींना 10 ते 14 दिवस क्वारंटाइन करण्यात येतं. या ठिकाणी त्यांना देण्यात येणाऱ्या खाण्याबद्दल अनेक तक्रारी आहेत. रोज किंवा दर दोन तीन दिवसांनी टेंडर आणि कंत्राट दिलं जातं. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांमध्ये त्यांच्या कंत्राटदाराला कंत्राट देण्याची स्पर्धा सुरू आहे. दोन वेळच्या जेवणाची आणि नाश्त्याची किंमत 100 रूपयांच्या पुढे जात नाही. परंतु अधिक दरानं रोज १ लाख लोकांच्या जेवणाची ऑर्डर दिली जाते. ६ महिने विलगीकरण केंद्र चालणार आणि शेकडो कोटींचा घोटाळा होणार,

दरम्यान, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहून याबाबतची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…अन्यथा आपल्या विधानाला कोणताही अर्थ उरणार नाही; अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

… तरीही भाजप नेत्यांना फक्त राज्यपालच दिसतात; बाळासाहेब थोरातांच भाजपवर टीकास्त्र

तुम्ही जर मुख्यमंत्री असता, तर आमच्यावर ही वेळच आलीच नसती; पोलिसाने फडणवीसांसमोर मांडली व्यथा

“शरद पवारांनी पंतप्रधानांऐवजी एखादं पत्र मुख्यमंत्र्यांनाही लिहावं”