आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी विराजमान श्रीगणरायाचे दर्शन घेतले. यानंतर भाजपच्याही अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर मनसे-भाजप युती होणार, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. यावर आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आरपीआय आणि भाजपच्या युतीत मनसेला घेऊ नये. असं झाल्यास भाजपचं देश पातळीवर मोठं नुकसान होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मनसेसोबत युती करणार नाही, असा शब्द आपल्याला दिल्याचा दावा रामदास आठवलेंनी यावेळी केला. लोणावळ्यात आरपीआयचा कार्यकारणी मेळावा पार पडला. त्यानंतर आठवलेंनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
हे ही वाचा : “अजित पवार पुन्हा नाराज?; राष्ट्रवादीच्या अधिवेशनात अजित दादांचं पुन्हा नाराजीनाट्य?”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गट भाजपशी जोडला गेल्याने युतीची ताकद वाढली आहे. अशा परिस्थितीत विभिन्न विचारसरणीच्या मनसेशी युती करू नये, अशी आरपीआयची भूमिका आहे, असंही रामदास आठवले म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
“काहीही झालं तरी 2024 ला गुहागरचा आमदार हा मनसेचाच होणार”
काँग्रेसचा ‘हा’ मोठा नेता भाजपच्या वाटेला?; ‘या’ नेत्याचं मोठं विधान, म्हणाले…
उद्धव ठाकरे पंतप्रधान बनतील या भितीने भाजपने शिवसेना फोडली; ‘या’ मोठ्या नेत्याचा दावा