आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणार आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही तिथे जाणार होते. मात्र आता एकनाथ शिंदे यांनी लालबागच्या राजाच्या दर्शनाला अमित शहा यांच्यासोबत न जाण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या, आधी जारी करण्यात आलेल्या कार्यक्रमांच्या नियोजनात अमित शहा यांच्यासोबतच्या लालबागच्या राजा मंडळाला भेट देण्याचा कार्यक्रमही आखण्यात आला होता. मात्र नंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असावा, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे अमित शहांसोबत एकनाथ शिंदे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाणार नाहीत, हे स्पष्ट झालं आहे.
हे ही वाचा : …अन् राज ठाकरेंनी चाहत्यांची सेल्फीची इच्छा केली पूर्ण
दरम्यान, शिक्षक दिन असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. दुपारी 3.30 वाजल्यानंतर ते गणेशोत्सवानिमित्त काही ठिकाणांना भेटी देणार असल्याचंही समोर येत आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“शिंदे गटाचा शिवसेनेला पुन्हा दणका; ‘या’ आक्रमक महिला नेत्या करणार शिंदे गटात प्रवेश?”