आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड केल्यानं शिवसेनेत मोठी फूट पडली. उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ असणारे अनेक मोठे नेते देखील शिंदे गटात गेले. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. अशातच शिवसेना आमदार भास्कर जाधव हे आक्रमकपणे उद्धव ठाकरेंची बाजू मांडत आहेत. त्यामुळे भास्कर जाधव हे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असं सध्याचं चित्र आहे. मात्र आज एक वेगळीच घटना घडली आहे.
भास्कर जाधव यांनी आज भाजपचे नेते आणि राज्याचे सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या गाडीतून प्रवास केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
हे ही वाचा : “मोठी बातमी! ठाकरेंच्या शिवसेनेनं केली संभाजी ब्रिगेडशी युती”
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या स्वागताकरता भास्कर जाधव परशुराम घाटात हजर होते. चव्हाण यांच्या स्वागतानंतर भास्कर जाधव हे परशूराम बस स्टॉप ते गेस्ट हाऊस एकाच गाडीने प्रवास करत गेले. त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
…तर पुन्हा मोर्चा काढणार; सह्याद्री अतिथी गृहावरील बैठकीनंतर मराठा समाजाचा मुख्यमंत्र्यांना इशारा
शिवसेनेच्या ताकदीत वाढ; पंजाब आणि हिमाचलमधील शिवसैनिकांनी दिली उद्धव ठाकरेंना साथ
महाराष्ट्राचा यूपी-बिहार करायचाय का?; राज ठाकरे संतापले