Home महाराष्ट्र जिथं सत्ता नव्हती, तिथं आणली गेली; शरद पवारांचं भाजपवर टीकास्त्र

जिथं सत्ता नव्हती, तिथं आणली गेली; शरद पवारांचं भाजपवर टीकास्त्र

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं. सत्ता स्थापन होताच या सरकारने या सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या अनेक निर्णयांवर फेरविचाराला सुरुवात केली आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता नाही. जिथं नव्हती तिथं आणली गेली. महाराष्ट्रातही भाजपची हुकुमत नव्हती, पण शिवसेनेचे आमदार गेल्यानं भाजपची हुकुमत आल्याची टीका शरद पवारांनी यावेळी केली.

हे ही वाचा : तुम्ही शिवसेनेतून कसे बाहेर पडलात?; राज ठाकरेंनी केला मोठा खुलासा, म्हणाले…

केंद्र सरकारकडून ईडी, सीबीआयचा वापर होतोय. ईडी, सीबीआयला सोबत घेऊन सध्या काम केलं जात आहे. आज देशातील लोकांमध्ये संभ्रम आहे. भाजप आणि त्यांच्या नेत्यांजवळ आज बहुमत आहे. पण हे उचित बहुमत नाही. देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता नाही. तिथं नव्हती तिथं आणली गेली. महाराष्ट्रात भाजपची हुकुमत नव्हती. मात्र शिवसेनेचे आमदार गेल्याने महाराष्ट्रात भाजपची हुकुमत आली, असंही शरद पवार म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच विधानभवनात झाले दाखल

शिवसेनेकडून हकालपट्टीचं सत्र सूरूच; आता आणखी 2 बंडखोर आमदारांची ठाकरेंकडून हकालपट्टी

राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त खोक्याचीच भाषा कळते; शिंदे गटाची टीका