आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यात विविध राजकीय घडामोडी घडत असताना शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे.
धर्मवीर आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांना उद्धव ठाकरेंनी पक्षाकडून मोठी जबाबदारी दिली आहे. ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची शिवसेनेकडून नियुक्ती करण्यात आली आहे.
हे ही वाचा : संजय राऊतांवरील कारवाईनंतर, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
ठाण्याचे माजी महापौर आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी केदार दिघे यांची ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ठाणे जिल्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यात अनिता बिर्जे यांना शिवसेना उपनेते पद मिळाले. प्रदीप शिंदे यांना ठाणे शहरप्रमुख पद तर चिंतामणी कारखानीस यांना ठाण्याचे विभागीय प्रवक्तेपद देण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर pic.twitter.com/p4E49UQIO1
— Shivsena Communication (@ShivsenaComms) July 31, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
मला अटक करायला निघाले आहेत, मी अटक करून घेतोय; ईडी कार्यालयाबाहेर संजय राऊतांनी दिले संकेत
संजय राऊत यांच्या ईडी कारवाईवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
“उद्धव ठाकरेंचं काम जनता कधीच विसरणार नाही, बंडखोरांना याची किंमत मोजावी लागेल”