Home महाराष्ट्र भाजप इंग्रजांचं धोरण राबवतेय; नाना पटोलें संतापले

भाजप इंग्रजांचं धोरण राबवतेय; नाना पटोलें संतापले

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत  यांच्या घरी ईडीची धाड पडली असून गोरेगावाच्या पत्राचाळ प्रकरणी ईडीने ही छापेमारी केली आहे. यावरुन कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठे भाजपावर निशाणा साधला आहे.

आमच्या विरोधात जो बोलेल त्याच्यावर कारवाई करू अस इंग्रजांनी आणलेल्या धोरणाची अमंलबजावणी भाजप सरकार करतय. संजय राऊत यांच्यावर कारवाई नवीन नाही. राऊतांवर दबाव आणि त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी हि कारवाई केली जात आहे. असा आरोप नाना पटोलेंनी केलायं.

अजून किती लोकांना जेलमध्ये टाकायचं हे भाजपने ठरवावे. परंतु भारतातील लोकशाहीला ते सोप्या पद्धतीन हलवू शकणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. आपले पाप लपविण्यासाठी अशी कारवाई करणे हे नवीन नाही, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

हे ही वाचा : शिंदे गटातून 40 आमदार गेले तरी…; बच्चू कडू यांचं मोठं विधान

अग्निपथ योजनेतील तरुणांचा उद्रेक वाढल्यानंतर लगेच ईडी कार्यालयात बोलावून वातावरण बदललं गेलं मुळ विषयाला डायव्हर्ट करण्यात भाजप एक्सपर्ट आहे. राज्यपालांनी जो खंजीर महाराष्ट्राच्या पाठीत खुपसला, जो घाव केला त्याला जनता कधी विसरणार नाही, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपचे कटकारस्थान जनतेला कळायला लागलं आहे. धनुष्यबाण गोठविण्याच काम आता ते करणार आहेत. एका पार्टीला संपवून आम्ही कसे जिवंत राहू अशा पद्धतीच घाणेरडे राजकारण 75 वर्षात कोणी केले नाही. हे खालच्या पातळीच आणि लोकशाहीला घातक राजकारण केंद्रातल भाजप सरकार करत असल्याचंही नाना पटोले यांनी  यावेळी म्हटंलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता; संजय शिरसाट यांचं मोठं विधान

“शरद पवारांनी नाही, तर फडणवीसांनी कटकारस्थान रचलं, आणि एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली”

मोठी बातमी; संजय राऊतांच्या घरी ईडीची धाड