आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. यामुळे शिवसेनेत 2 गट पडले आहेत. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेतील पक्षफुटी आणि त्याची कारणं यावर भाष्य केलं आहे.
शिवसेना पक्षफुटीला कुटुंबातीलच लोक जबाबदार आहेत, असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. राज ठाकरेंनी आज झी 24 तास या मराठी वृत्तवाहिनाला मुलाखत दिली. यावेळी ते बोलत होते.
शिवसेना का फुटली यावर लोकांना थेट आरोप करता येत नाहीत. त्यामुळे संजय राऊतांसारखे एक माध्यम निवडायचे आणि झोडायचे. आपल्या मनातला राग काढायचा असे केले जाते. मात्र शिवसेना विखुरण्याला कुंटुबातीलच लोक जबाबदार आहेत. राजकारण तसेच इतर व्यवहारामध्ये त्यांची दखल जास्त प्रमाणात व्हायला लागली तेव्हापासूनच या गोष्टी घडत गेल्या. मिही त्याच कारणामुळे बाहेर पडलो. आता बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे तसेच इतर आमदारांना विचारा तेही हेच सांगतील, असं राज ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा : शिवसेना कुणाची? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले…
दरम्यान, चांगल्या काळामध्ये सत्तेवर यायचं, संपत्ती गोळा करायची. वाईट काळ आला की, बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर लोकांना भावनिक करायचं, असे उद्योग सुरु आहेत. असुरक्षित माणसं कधीही प्रगती करु शकत नाहीत. ते याच्या खांद्यावर त्याच्या खांद्यावर प्रवास करत असतात. कोणी उतरवलं की त्यांना त्याची जाणीव होते, असा अप्रत्यक्ष टोला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.
महत्त्वाच्या घडामोडी –
जुन्नरमध्ये पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकणार; ‘या’ नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट