आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळं शिवसेनेत दोन गट पडले आहेत. आमदार आणि खासदारांपाठोपाठ राज्यातील अनेक महापालिका तसेच नगपालिकांचे नगरसेवक शिवसेनेत दाखल होत आहेत.जपने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी जवळीक साधण्यास सुरुवात केली. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हाच आमचा कायमस्वरूपी ब्रॅण्ड आहे. उद्धवजी हा ब्रॅण्ड घेऊन राजकीय वाटचाल करत आहेत आणि यापुढेही करतील. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे ही दोन बाजू असलेले चलनी नाणे शिवसेनेकडे आहे. शिवसेनेने प्रहार ते प्रशासन असा धगधगता प्रवास केला आहे. सत्ता हे साध्य आहे, साधन नाही याची जाणीव बाळासाहेब शिवसैनिकांना नेहमीच करून देत होते, असं अरविंद सावंत म्हणाले.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन केला नाही; फडणवीसांना फोन केल्याच्या बातमीचं शिवसेनेकडून खंडण
शिवसेनेमध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी अनेकांनी बंडखोरी केली. उद्धव ठाकरे यांनी वर्षा सोडताना उभा महाराष्ट्र हळहळला. अडीच वर्षात कोरोनासारखं संकट असताना त्यांनी अद्भुत कामगिरी करत सर्वोत्तम मुख्यमंत्री असा सन्मान मिळवला. शिवसेनेची पुण्याई त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे त्यांची पुढील राजकीय वाटचाल ही निश्चितच यशाकडे झेप घेणारी असेल. त्यामुळे यापुढेही उद्धव ठाकरे हेच नाव चालेल, असही अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शिवसेनेने दिलदारपणे भाजपला हात दिला, पण भाजपने सुरुवातीपासूनच शत प्रतिशतचा नारा देत आपला असली चेहरा दाखविला, अशी टीकाही अरविंद सावंत यांनी यावेळी केली.
महत्त्वाच्या घडामोडी –
“कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, खासदार संजय मंडलिक गटाचा, शिंदे गटात जाण्याचा निर्णय”
शिवसेनेकडून बंडखोरांना मोठा धक्का; आणखी 2 बंडखोर नेत्यांवर सेनेकडून मोठी कारवाई
उद्धव ठाकरे यांना नारायण राणेंनी डिवचलं, म्हणाले, ते फक्त…