आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.
यानंतर आता शिवसेनेत उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे असे दोन गट पडले आहेत. शिंदे यांना समर्थन देणाऱ्या आमदारांविरोधात आता शिवसेनेनं कडक कारवाई करण्यास सूरूवात केली आहे. काल शिवसेनेने आमदार विश्वनाथ भोईर यांची कल्याण शहराच्या प्रमुखपदावरुन हकालपट्टी केली त्यानंतर आता शिवसेनेने यवतमाळच्या खासदार भावना गवळी आणि आमदार संजय राठोड यांच्या समर्थकांवरही कारवाई केली आहे.
हे ही वाचा : उद्धव ठाकरे यांना नारायण राणेंनी डिवचलं, म्हणाले, ते फक्त…
दरम्यान, आगामी काळातील संभाव्य धोका लक्षात घेत शिवसेनेने यवतमाळ जिल्ह्यात अनेक पदांवर नव्या नियुक्त्या केल्या आहेत. भावना गवळी तसेच संजय राठोड यांना समर्थन देणाऱ्या यवतमाळ शहरप्रमुख, यवतमाळ जिल्हा संपर्कप्रमुख, तसेच आर्णी तालुकाप्रमुखांना पदावरुन दूर करण्यात आलं आहे. येथे नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
सोलापुरात शिवसेनेला जबरदस्त धक्का; हजारो कार्यकर्ते शिंदे गटात सामील
तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही, पण…; उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना भावनीक आवाहन
अमित ठाकरेंचं फुटबॉल कौशल्य पाहिलतं का; जगलिंग करतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल