Home महाराष्ट्र शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर बंडखोर आमदार संतोष बांगर यांंची प्रतिक्रिया, म्हणाले…

शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर बंडखोर आमदार संतोष बांगर यांंची प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.

यानंतर आता शिवसेनेत उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे असे दोन गट पडले आहेत. तसेच शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंनी या बंडखोरांना परत येण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र यात यश न आल्यानं शिवसेनेनं आता एक मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांची हिंगोलीच्या जिल्हा प्रमुखपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. यावरून आता संतोष बांगर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : बंडखोर आमदारांविरोधात कठोर पावले उचलण्यास सूरूवात; ‘या’ आमदारांवर शिवसेनेची मोठी कारवाई

मी अजूनही शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे, शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याने एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलं, मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकनिष्ठ शिवसैनिक आहे., असं बांगर म्हणाले. याकारणात्सव ते आज शक्तीप्रदर्शन करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिवसेनेला पुन्हा हादरा! ‘हा’ नेता एकनाथ शिंदे गटात सामील

मनसेला मंत्रीमंडळात घेण्यास आमचा विरोध, आरपीआयला मंत्रीमंडळात स्थान हवं- रामदास आठवले

गिरीश महाजन हे बालिश, आजपर्यंत माझी पादत्राणे घेऊन ते मत मागत होते; एकनाथ खडसेंचं जोरदार प्रत्युत्तर