आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं. आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत टोला लगावला होता.
शिंदे-फडणवीस सरकार कधीही पडू शकते. त्यामुळे मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहा, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. यावरून आता एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हे ही वाचा : शिवसेनेचे आमदार फुटत होते आणि मला दुःख होत होतं- बाळा नांदगावकर
शरद पवार खूप मोठे नेते आहेत. मात्र, आपल्याला माहिती आहे की ते जे बोलतात बरोबर त्याच्या विरुद्ध होतं, असा प्रतिटोला एकनाथ शिंदेंनी यावेळी लगावला. पुढच्या 5 वर्षांसाठी पुन्हा सत्तेत येऊ. मी जास्त पुढचं सांगत नाही, नाहीतर इतर लोक बोलतात तसं एकनाथ शिंदे बोलतात असं होईल. आमचं सरकार हे अडीच वर्ष यशस्वीपणे पूर्ण करेन. पुढील निवडणुकीत आम्ही १६५ वरून आमचे 100 व भाजपाचे 100 असे 200 आमदार निवडून येतील., असा दावा एकनाथ शिंदेंनी यावेळी केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
“फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत म्हणून कितीतरी भाजपाचे नेते ढसाढसा रडायला लागले”
‘…याचं भान सर्व राजकीय नेत्यांनी बाळगायला हवं’; अमित ठाकरेंची शिंदे सरकारवर टीका