आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं आहे. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं. अशातच आता एकनाथ शिंदे यांनी मेट्रो कारशेड प्रस्तावित आरेच्या जागेतच होणार असा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी थेट शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
मेट्रो कारशेड आरे जंगलातच करण्याचा नव्या सरकारने घेतलेला निर्णय माझ्यासारख्या असंख्य पर्यावरणप्रेमींसाठी धक्कादायक आहे. आरेमध्ये कारशेड होऊ नये म्हणून शेकडो तरुण-तरुणींनी संघर्ष केला होता. काहींना तर पोलिसांनी गजाआड टाकलं होतं. आपल्याला विकास हवाच आहे, पण पर्यावरणाचा बळी देऊन नको, असं अमित ठाकरे म्हणाले आहेत.
हे ही वाचा : अमित शहांनी मला दिलेलं वचन मोडलं, अन्यथा…; उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
आपलं पर्यावरण उद्ध्वस्त झालं तर भविष्यात राजकारण करायला माणूस नावाचा प्राणी शिल्लकच राहणार नाही, याचे भान सर्व राजकीय नेत्यांनी बाळगायला हवे. नवे मुख्यमंत्री आणि नवे उपमुख्यमंत्री यांनी आरेतील मेट्रो कारशेडबाबतच्या आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, ही आग्रहाची विनंती, असंही अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे
दरम्यान, आरेतील प्रस्तावित कारशेड कांजूर मार्ग येथे नेण्याचा निर्णय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतला होता. मात्र आता एकनाथ शिंदे यांनी मेट्रो कारशेड प्रस्तावित आरेच्या जागेतच होणार असा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
शिंदे-फडणवीस सरकार किती दिवस टिकणार?; जयंत पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…
‘लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही…’; रुपाली चाकणकरांनी ट्विट करत केलं उद्धव ठाकरेंचं समर्थन
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…