आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यात एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या एक दिवसानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला.
जर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मला दिलेलं वचन पूर्ण केलं असतं तर आज राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असता., असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा : शिंदे-फडणवीस सरकार किती दिवस टिकणार?; जयंत पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…
2019 मध्ये युतीदरम्यान मी अमित शहा यांना म्हणालो हो, की, अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि अडीच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री असेल. जर त्यांनी हे मान्य केलं असतं तर आघाडी सरकारसोबत युती करावी लागली नसती. आणि आता अडीच वर्षांनंतर राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असता, असा खुलासा उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
‘लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही…’; रुपाली चाकणकरांनी ट्विट करत केलं उद्धव ठाकरेंचं समर्थन
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“फडणवीसांनी नंबर दोनची जागा आनंदाने स्वीकारल्यासारखं वाटत नाही, त्यांचा चेहरा तसं सांगत नाही”