आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं आहे. या बंडामुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अशातच काल सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेनं दाखल केलेल्या बहुमत चाचणीविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना शिवसेनेविरोधात निकाल दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर केवळ भाजप गोटातच हालचाली वाढल्या असे नाही तर गेल्या 10 दिवसांपासून राज्याबाहेर असलेले एकनाथ शिंदे हे देखील झेड सुरक्षा कवचामध्ये मुंबईत पोहचले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे शपथविधी देखील उरकून घेतील अशी स्थिती आहे.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरे यांचं सूचक ट्विट, म्हणाले…
दरम्यान, आज सायंकाळी 7 वाजता शपथविधी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रशासनाकडून राजभवनावर जय्यत तयारी सुरू झाल्याची माहिती पुढे आली आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
“…त्यामुळे हे सरकार जाण्याचे दुःख आहे”; उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया