आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं आहे. या बंडामुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अशातच काल रात्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. राज्यपालांनी 30 जून रोजी विशेष अधिवेशन बोलावले असून महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
हे ही वाचा : मोठी बातमी! औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मंजूर
बहुमत चाचणीनंतर ठाकरे सरकारच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. अशातच आता देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला. विधानसभेत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचे एक मत भाजपच्या बाजूने द्यावे, अशी मागणी त्यांनी राज ठाकरेंकडे केली.
देवेंद्र फडणवीस यांच्या या विनंतीनंतर राज ठाकरे यांनी मनसेकडील एक मत भाजपच्या बाजूने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्याच्या बहुमत चाचणीमध्ये मनसेचे आमदार राजू पाटील हे महाविकास आघाडीविरोधात मतदान करणार आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
“भाजपकडून राज्यघटनेच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत”
उद्या मुंबईत येतोय, बहुमत चाचणीला हजर राहणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
शिवसेना आमदारांच्या बंडखोरीमागचा खरा सूत्रधार कोण?; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं नाव, म्हणाले…