आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू आहे. अशातच आता शिवसेनेतील खासदारही भाजपसोबत सरकार बनवण्यासाठी आग्रही असल्याची माहिती पुढे आली आहे.
राष्ट्रवादी-काँग्रेसला सोडा आणि भाजपसोबत चला, अशी मागणी शिवसेना खासदारांनी शिवसेनेच्या बैठकीत केली असून, त्याबाबतचा निरोप पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
हे ही वाचा : शिवसेनेला मोठा धक्का! ‘हा’ बडा नेताही गुवाहाटीला पोहोचला, आणखी एक आमदार शिंदेंना जाऊन मिळणार?
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच फेसबूक लाइव्हद्वारे आपली भूमिका मांडली आहे. आपण अयोग्य आहोत हे बंडखोर आमदारांनी समोर येऊन सांगावं आपण लगेच राजीनामा देऊ, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
“हे जे काही शिवसेनेत चाललं आहे त्याच्याशी…”; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली खदखद, म्हणाले…
एकनाथ शिंदेंचीच शिवसेना, खरी शिवसेना- रामदास आठवले