आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी राजकिय बंड पुकारला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच फेसबुक लाईव्ह येत जनतेशी संवाद साधला.
मी आजच वर्षा बंगला सोडून मातोश्रीला जाणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं. मला पदाचा मोह नाही, मी आजही मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार आहे. बंडखोर आमदारांनी समोर यावं, अशी भावनिक साद उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केली होती.
हे ही वाचा : शिवसेना नेते आणि आमदारांची बंडखोरी हे सर्व भाजपचे षडयंत्र; सुरतहून परतलेल्या नितीन देशमुख यांचा आरोप
मुख्यमंत्र्यांच्या भाषनानंतर मुंबईभरातून शिवसैनिक वर्षा बंगल्याच्या दिशेने निघाले होते. एरवी राडा घालणाऱ्या शिवसैनिकांच्या डोळ्यात आज अश्रू दिसत होते. आपल्या नेत्याला झालेल्या दु:खामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिक दुखावल्याचं सांगितलं जात होतं. शेवटी आज 9 वाजून 45 मिनिटांनी उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्य ठाकरे यांना सोबत घेऊन मातोश्रीच्या दिशेने निघाले.
दरम्यान, वर्षाच्या दाराच्या बाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती. मुख्यमंत्र्यांनी उंबरठा ओलांडताच शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यांच्या गाडीला मुख्यमंत्र्यांनी गराडा घातला. आपल्या नेत्यासाठी हे शिवसैनिक मुंबईतील कानाकोपऱ्यातून येत होते. यावेळी रश्मी ठाकरे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
#WATCH Maharashtra CM Uddhav Thackeray along with his family leaves from his official residence, amid chants of “Uddhav tum aage badho, hum tumhare saath hain” from his supporters.#Mumbai pic.twitter.com/m3KBziToV6
— ANI (@ANI) June 22, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
…तर मी राजीनामा द्यायला तयार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान
“मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण, रिलायन्स रूग्णालयात दाखल”
“महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप?; एकनाथ शिंदेंसह 40 आमदार सूरतहून गुवाहाटीत दाखल”