आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सांगली : राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषदेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली असून मोर्चेबांधणीला सुरूवात देखील केली आहे. तसेच भाजपनं महाविकास आघाडीला मोठा धक्का देत आपले सर्व उमेदवार निवडून आणत विजय साजरा केला. त्यानंतर आता विधानपरिषद निवडणूकीत काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
भाजपचे सांगलीचे खासदार संजय काका पाटील व सांगलीचे पालकमंत्री तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कराडमध्ये भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. कराड तालुक्यातील घारेवाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर झाले.
हे ही वाचा : “शिवसेनेची यशस्वी खेळी; भाजपच्या ‘या’ नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”
दरम्यान, या शिबाराला भेट देण्यासाठी जयंत पाटील येथे आले होते. विमानाने कराडच्या विमानतळावर ते उतरले. त्यावेळी विमानतळावर राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. तसेच जयंत पाटील येणार असल्याने त्यांच्या भेटीसाठी खासदार संजय काकाही तेथे आले होते. त्यानंतर जयंत पाटील येताच त्यांच्या वाहनातून दोघेही तत्काळ रवाना झाले. त्यामुळे विविध राजकीय तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
शरद पवारांनी राष्ट्रपतीपदाची उमेदवारी का नाकारली?; स्वत: शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…
देवेंद्र फडणवीस म्हणजे…; रावसाहेब दानवेंकडून कौतुक
भाजपचा शिवसेनेला मोठा; शिवसेना महिला आघाडीतील अनेक महिलांचा भाजपमध्ये प्रवेश