Home पुणे राज ठाकरेंचे विचार जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मनसैनिकांकडून पत्र वाटप, रोज 2500 पुणेकरांच्या भेटीला

राज ठाकरेंचे विचार जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मनसैनिकांकडून पत्र वाटप, रोज 2500 पुणेकरांच्या भेटीला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्यात यावेत, अशी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर मनसैनिकांनी राज्यभर आंदोलने केली होती.

पुण्यातही आंदोलन करण्यात आले. मात्र हे आंदोलन कायम राहील, असं राज यांनी जाहीर करतानाच त्यामागील भूमिका पत्ररुपाने नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येईल, असं पुण्यातील सभेत स्पष्ट केले होते. राज ठाकरे यांचे विचार पत्राद्वारे सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास मनसे पदाधिका-यांकडून प्रारंभ झाला आहे.

हे ही वाचा : “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी बोलल्यामुळे, उपमुख्यमंत्री बोलले नाहीत”

दरम्यान, कोथरूड, शिवाजीनगर, खडकवासला, पर्वती, हडपसर, कसबा आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघात रोज अडीच हजार पत्रांचे वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा पुणे शहर मनसे पदाधिका-यांनी केला आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

ऋतुराज गायकवाड-ईशान किशन चमकले; करो वा मरोच्या सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय

राज्यपाल महोदय, घर चांगलं बांधलंय, एक्सचेंज करायचं का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा टोला

पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी का नाकारली?; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले…