Home पुणे राज्यपाल महोदय, घर चांगलं बांधलंय, एक्सचेंज करायचं का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा टोला

राज्यपाल महोदय, घर चांगलं बांधलंय, एक्सचेंज करायचं का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा टोला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राजभवनातील ‘क्रांती गाथा’ या भूमिगत दालनाचे उद्घाटन केलं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात जोरदार हशा पहायला मिळाला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात बोलताना, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना जोरदार टोला लगावला. राज्यपाल महोदय घर चांगलं आणि मोठं बनवलंय, एक्सचेंज करायचं का?, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी करताच कार्यक्रमात जोरदार हशा पिकला.

हे ही वाचा : पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी का नाकारली?; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले…

दरम्यान, राज्यपाल यांच्या निवासस्थान जलभूषण चे नूतनीकरण झालं आहे. ते खूपच मोठं आणि चांगलं दिसत आहे. मग करायचं का एक्सचेंज. असं म्हणताच कार्यक्रमात सर्वांना हसू आवरता आलं नाही.

महत्त्वाच्या  घडामोडी –

राष्ट्रपतीपदाची उमेदवारी स्वीकारणार का? शरद पवार म्हणतात…

ठाण्यात राजकीय तणाव; राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले बॅनर अज्ञातांनी फाडले

संभाजीराजे हे आमचे छत्रपती, मात्र शिवसेनेवरील टिका खपवून घेतली जाणार नाही