आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी विधान परिषद निवडणुकींसाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. यात भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. सदाभाऊ खोत यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.
अर्ज मागे घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खोत यांनी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जे काही निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया दिली. यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : काँग्रेसची मोठी खेळी; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यानं असंख्य समर्थकांसह केला काँग्रेसमध्ये प्रवेश
सदाभाऊ उतारवयात आराम करता यावा म्हणुनच फडणवीसांनी आपणास विश्रांती घ्यायचा सल्ला दिलाय, मात्र आपण माघार घेतली यावर विश्वासच बसत नाही. भाऊ त्या फडणिसांना सांगा, म्हणावं, “म्या एक पाऊल मागं आलुया म्हंजी थकलो नाय. आणखी दोन पावलं माग येऊन सन्या गुमान बसल.”, असा टोला अमोल मिटकरींनी यावेळी सदाभाऊ खोतांना लगावला.
सदाभाऊ उतारवयात आराम करता यावा म्हणुनच फडणवीसांनी आपणास विश्रांती घ्यायचा सल्ला दिलाय, मात्र आपण माघार घेतली यावर विश्वासच बसत नाही.
भाऊ त्या फडणिसांना सांगा, म्हणावं, “म्या एक पाऊल मागं आलुया म्हंजी थकलो नाय. आणखी दोन पावलं माग येऊन सन्या गुमान बसल.”@Sadabhau_khot— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 13, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
विधानपरिषद निवडणुकीपूर्वी प्रसाद लाड यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; चर्चांना उधाण
अजित पवार यांनी पुन्हा आमच्यासोबत यावं; भाजपच्या ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य