Home महत्वाच्या बातम्या राज्य शासनानं स्थलांतरित मजुरांना आपल्या गावी परतवण्याची व्यवस्था करावी- चंद्रकांत पाटील

राज्य शासनानं स्थलांतरित मजुरांना आपल्या गावी परतवण्याची व्यवस्था करावी- चंद्रकांत पाटील

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोजगारासाठी परराज्यातून येऊन महाराष्ट्राच्या विविध भागात वसलेले मजूर आपापल्या गावी परतण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. यापैकी काहीजण जीवावर उदार होऊन पायी निघाले आहेत, यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे.

औरंगाबादमध्ये शुक्रवारी घडलेल्या घटनेत अशाप्रकारे पायी जाणाऱ्या मजुरांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे अशा सर्व स्थलांतरित मजुरांना आपल्या गावी परतण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे अतिरिक्त रेल्वे गाड्यांची मागणी करावी, अशी विनंती चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

केंद्र सरकार सर्व प्रवाशांचा 85 टक्के खर्च उचलत आहे. केवळ 15 टक्के भार हा राज्य सरकारला उचलायचा आहे. महाराष्ट्रातील मजुरांचे स्थलांतराचे प्रमाण पाहता राज्य सरकारने हा भार उचलून केंद्र सरकारकडे अतिरिक्त रेल्वे गाड्यांची मागणी करावी, आणि या सर्व प्रवाशांचा आपापल्या गावी परतण्याचा मार्ग सुकर करावा,” असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

…म्हणून प्रवीण परदेशींना बळीचा बकरा बनवण्यात आलं; किरीट सोमय्याचं ठाकरे सरकरावर टिकास्त्र

…म्हणून अंत्यविधीला 20 जणांना तर दारुच्या दुकानासमोर हजारोंना परवानगी- संजय राऊत

कोणत्याही लसीशिवाया निघून करोना व्हायरस; डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य

“औरंगाबादजवळ रेल्वेखाली चिरडून मरण पावलेले मजूर कोरोना आणि लॉकडाऊनचे बळी”