वाशिंगटन : प्रतिबंधित लसीशिवाय करोना व्हायरस निघून जाईल असं वक्तव्य आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. अमेरिकेत येत्या काळात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या 95 हजार किंवा त्यापेक्षाही पुढे जाईल. असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे.
करोना व्हायरस हा कोणत्याही लसीशिवाया निघून जाईल. असा दूर जाईल की आपण त्याला पुन्हा पाहूच शकणार नाही. आत्तापर्यंत अनेक आजार आले आणि कोणत्याही लसीशिवाय निघून गेले तसाच करोनाही जाईल. हे सगळं लगेच घडेल का? तर तसं माझं म्हणणं नाही. मात्र एक वेळ अशी येईल की करोना नाहीसा झालेला असेल, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, जगभरातल्या 200 देशांवर करोना नावाचं संकट कोसळलं आहे. अनेकांचा या रोगाची लागण झाल्याने मृत्यूही झाला आहे. अशात आता डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्याही लसीशिवाय करोना निघून जाईल असं वक्तव्य केलं आहे. ‘द गार्डियन’ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“औरंगाबादजवळ रेल्वेखाली चिरडून मरण पावलेले मजूर कोरोना आणि लॉकडाऊनचे बळी”
उद्धव ठाकरेंच्या आमदारकीसाठी महाविकास आघाडीचे नेते आक्रमक; घेतली राज्यपालांची भेट
उत्तर प्रदेशातील साधू हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा योगी आदित्यनाथ यांना फोन; म्हणाले…
लॉकडाउन हळूहळू शिथिल झालं पाहिजे- सुप्रिया सुळे