Home महाराष्ट्र “औरंगाबादजवळ रेल्वेखाली चिरडून मरण पावलेले मजूर कोरोना आणि लॉकडाऊनचे बळी”

“औरंगाबादजवळ रेल्वेखाली चिरडून मरण पावलेले मजूर कोरोना आणि लॉकडाऊनचे बळी”

मुंबई :  औरंगाबादजवळ रेल्वेखाली चिरडून मरण पावलेले 16  स्थलांतरित मजूर हे करोना आणि लॉकडाऊनचेच बळी आहेत. त्यामुळं त्यांच्या मृत्यूची ‘अपघाती’ म्हणून नोंद न करता करोना बळींच्या यादीत त्यांचा समावेश व्हायला हवा, असं मत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

रेल्वेखाली चिरडून मारल्या गेलेल्या मजुरांना करोना संक्रमणाची कोणतीही लक्षणे नव्हती. त्यांना थंडी भरून ताप आला नाही. त्यांना सर्दी-खोकला नव्हता. त्यांना श्वास घेण्यास अडथळे नव्हते. त्यांची प्रकृती चांगली होती तरीही ते कोरोनाचे बळी आहेत, असं शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, रोजच्या रोज करोनाच्या नव्या मृतांचे आकडे प्रसिद्ध होत असतात. त्यात या 16 जणांचा समावेश व्हायला हवा,’ असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

भाजपाच्या निर्णयावर रामदास आठवले नाराज; म्हणाले…

त्या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही; विधान परिषद उमेदवार निवडीवर पंकजा मुंडेंनी सोडल मौन

सगळे नेते राजकारण बाजूला ठेवून एकवटल्यामुळे माझा आत्मविश्वास दुणावला- उद्धव ठाकरे

शिवरायांच्या महाराष्ट्रात लष्कराची गरज नाही- उद्धव ठाकरे